मुंबई – जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचा-यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपात वडाळा येथील डॉ. आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविध्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
सन 2005 नंतर बंद केलेली जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी या साठी राज्यभरातील 18 लाख कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, त्यात आज डॉ. आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविध्यालयाच्या कर्मचा-यांनी सहभाग घेतला आहे. या संपात किरण पखले, युनिट अध्यक्ष, वैजिनाथ वडवेराव, युनिट उपाध्यक्ष, उज्वला गायकवाड, सचिव, मनीषा वाळेकर, गणेश पटिल, राहूल घोडके, चंद्रकांत पवार, रवींद्र गंगावणे, देवानंद खाडे, रोमित कर्णिक, बिरू शेळके, प्रशांत मोहिते, श्रीजय मोहिते, बिरू शेळके, विजय चव्हाण, भुषण बोरोले, विशाल सावळे, हर्षाली तांबे, चेतन घोईल सहभागी होते.