मुंबई – “नाटू नाटू” या बहारदार गाण्याने भारताला आॅस्कर मिळवून दिला. लॉस एंजलिस इथे झालेल्या ९५ व्या आॅस्कर सोहळ्यात गाण्याने आॅस्करवर आज भारताची मोहोर उमटली. देशासाठी ही गौरवाची आणि अभिमानाची बाब ठरली. सोशल मिडिया या गाण्याने व्यापून गेला होता. आज या गाण्याचे जगावर गारूड होते.
चित्रपटसृष्टीसाठी हा मानाचा पुरस्कार आहे. जगभरातील सिने कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पहात असतात. यंदाच्या या पुरस्कार सोहळयात “आरआरआर” या चित्रपटातील “नाटू नाटू” या गाण्याला आॅस्करसाठी बेस्ट ओरिजनल सॉंग या श्रेणीत नामांकन मिळाले होते. अखेर या गाण्याने आॅस्कर जिंकले. आरआरआर या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले असून एमएम कीरावानी यांनी हे गाणे संगीतबध्द केले आहे. काला भैरव आणि राहूल यांनी हे बहारदार गाणे गायले आहे. गाण्याचे सादरीकरण जबरदस्त झाले असून आॅस्करला गवसणी घालणा-या या गाण्याने आता जगाला थिरकायला लावले आहे.
द एलिफंट व्हिस्पर्सलाहा आॅस्कर
द एलिफंट व्हिस्पर्स ने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म्स या श्रेणीत बाजी मारली आणि आॅस्टर जिंकला. भारताला दोन आॅस्कर मिळाल्याने भारतायीच मान अभिमानाने उंचावली आहे.