Home देश विदेश सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १५ मे पूर्वी लागण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १५ मे पूर्वी लागण्याची शक्यता

by Vishnu Sonawane

मुंबई – राज्यातील सत्ता संघर्षाच्याबाबत नेमलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात न्यायमूर्ती एम. आर. शाह यांचा समावेश आहे. ते येत्या १५ मे पूर्वी निवृत्त होत आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल या तारखेपूर्वी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांचा युक्तीवाद आज पूर्ण झाला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून हा युक्तीवाद सुरू होता. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या आता निकालाकडे लागले आहे. निकाल कोणाच्या बाजूने लागणार याबाबत कमालिची उत्सूकता निर्माण झाली आहे. दोन्ही गटाच्या वकीलांनी आपल्या गटाची जोरदार बाजू मांडली आहे. गेल्या जून पासून राज्याच्या राजकारणात मोठी स्थित्यंतरे झाली. संघर्ष झाला. युक्तीवाद संपला असला तरी निकाल कधी जाहिर होणार याबाबत कोणतीही स्पष्टता घटनापीठाने केलेली नाही. निकाल घटनापीठाने राखून ठेवला आहे. मात्र न्यायमूर्ती शाह हे येत्या १५ मे रोजी निवृत होत असून त्यापूर्वी निकाल जाहिर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत आणि अभिषेत मनुसिंघवी यांनी युक्तीवाद केला. तर ज्येष्ठ वकील हरीश साळवे, महेश जेठमलानी, नीरज किशन कौल यांनी युक्तीवाद केला. या सत्ता संघर्षाच्या युक्तीवादातील कालचा आणि आजचा दिवस महत्वाचा होता.

सरन्यायाधीशांची नाराजी
राज्याचे तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहूमत चाचणीसाठी निमंत्रण देण्याची कृती ही सरकार पाडण्याला कारणीभूत ठरल्याची टिप्पणी करीत नाराजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली.

You may also like

न्यूज स्पार्क

बातम्यांचा सखोल आढावा

कविता विष्णू सोनावणे

संपादक

Kavita Vishnu Sonawane

Editor

इमेल अपडेट

न्यूज स्पार्क – बातम्यांचा सखोल आढावा @ २०२५ सर्व अधिकार राखीव

रचना आणि मांडणी – बियॉंड वेब