मुंबई – अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनीही सरकारविरोधातील आंदोलनात विरोधी पक्षनेत्यांना पाठिंबा दिला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी, यासाठी तांबे प्रयत्नशील आहेत.
विधान परिषदेत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा मांडण्यात आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर विरोधकांच्या तीव्र विरोधानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. मूळ प्रश्न सोडवून ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार अपयशी ठरत असल्याची निदर्शने यावेळी करण्यात आली. आमदार सत्यजित तांबे यांनीही सरकारविरोधातील आंदोलनात विरोधी पक्षनेत्यांना पाठिंबा दिला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी, यासाठी तांबे प्रयत्नशील आहेत.